New Trends मेनिक्युअर तुम्ही केले आहे का....?
Manicure at Home
सौदर्य वृद्धिगत करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही मॅनिक्युअरची मदत घेऊ शकता . मेनिक्युअर आठवड्यातून एकदा किंवा दहा दिवसातून एकदा अवश्य करू शकता . हे तुम्ही घरीसुद्धा करू शकता .
चेह-याप्रमाणेच हातही सुंदर दिसणं हे आपल्या चांगल्या राहणीमानाचं आणि उत्तम आरोग्याचं लक्षण आहे . हातांचं सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी हवामानानुसार ट्रिटमेंट करणं खूप गरजेचे आहे . हे सौंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही मेनिक्युअरची मदत घेऊ शकता . .
मेनिक्युअर आठवड्यातून एकदा किंवा दहा दिवसातून एकदा अवश्य करू शकता . हे तुम्ही घरीसुद्धा करू शकता . मेनिक्युअर स्पासाठी एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या . त्यामध्ये गुलाबाची पानं , इसेंशियल ऑइलचे चार - पाच थेंब , थोडंसं मीठ घाला . मेनिक्युअर स्पा घेण्यापूर्वी हातावर थोडंसं मीठ टाका.
मेनिक्युअर स्पा घेण्यापूर्वी हातावर अँटीसेप्टीक लवेंडरचा स्प्रे करा . अँटीसेप्टरने हातावरील फंगस निघून जातील . आता हातांवर पाणी टाका . थोडा वेळ हात पाण्यात बुडवून ठेवा . मग त्यामध्ये माइल्ड शैम्पू घाला . हलक्या हाताने स्वच्छ करा .
जर नखं मोठी असतील तर त्यांना नेलकटरच्या साहाय्याने छान आकार द्या . हात स्वच्छ झाल्यानंतर क्यूटिकल रिमूव्हर लावा . पुन्हा हात पाण्यात ठेवा . पाच मिनिटांनंतर हात पाण्यातून काढून घ्या . त्यावर इसेशियन ऑइलच्या साहाय्याने पाच मिनिटं मसाज करा . त्यानंतर हाताला चंदन स्क्रब लावा . यामुळे हात मुलायम होतील , २० मिनिटांपर्यंत हा पॅक ठेवून द्या.
पॅक धुतल्यानंतर हातांना क्रिमने मसाज करा या संपूर्ण प्रक्रियेनंतर नखांना नेलपेंट लावा , जेणेकरून हात अधिक आकर्षक दिसतील . जर तुमच्या हाताला टॅनिंग झालं असेल तर घरीच ब्लीच करा . सकाळी १० ते ४ या वेळात तीव्र उन्हात बाहेर पडताना हात झाकले जातील आणि त्यांना सन्सस्क्रिन आठवणीनं लावलं जाईल याची काळजी घ्या . हातांवर वेळोवेळी मॉइश्चराइझर लावा . यानंतरही हातांचे टॅनिंग गेलं नाही तर हँड क्रिमचा वापर करा.
New Trends मेनिक्युअर तुम्ही केले आहे का....?
Reviewed by Daily Wisdom
on
June 23, 2019
Rating:
No comments:
Post a Comment