आनंदी दिर्घ आयुष्याचे जपानी रहस्य जाणून घ्या
जगातील कोट्यवधी लोकांना जपानी रहस्यचे आकर्षण इकीगाई म्हणजे जगण्याचे कारण आणि अर्थ शोधणे
#feng shui tips hindi #astrology #wisdom #wisdom365
या प्रश्नांची उत्तरे शोधावीत . . . दीर्घ आणि निरोगी आयुष्याचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न संशोधक अनेक शतकांपासून करत आहेत . गुणसूत्रे , आहार आणि व्यायाम हे तीन घटक यासंदर्भात नमूद केले जातात . यामध्ये आयुष्याचा अर्थ शोधणे या घटकाचा मात्र ठळकपणे विचार केला जात नाही , इकीगाई पद्धतीत तसा तो केला जातो .
आपल्या कोणत्या गोष्टींनी आनंद होतो , कोणत्या कृती करायला आपल्याला आवडतात आपल्या आयुष्यात कोणती तत्वे आणि व्यक्ती महत्त्वाच्या आहेत ? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणे या पद्धतीत अपेक्षित आहे .
आपल्या कोणत्या गोष्टींनी आनंद होतो , कोणत्या कृती करायला आपल्याला आवडतात आपल्या आयुष्यात कोणती तत्वे आणि व्यक्ती महत्त्वाच्या आहेत ? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणे या पद्धतीत अपेक्षित आहे .
इकीगाई ( Ikigai ) हे आहे जपानी नागरिकांच्या आनंदी दीर्घायुष्याचे रहस्य जपानमध्ये वयाची शंभरी गाठणे याचे कोणालाच आश्चर्य वाटत नाही . जपानी भाषेत इकी म्हणजे जगणे आणि गाई म्हणजे कारण , इकीगाई म्हणजे जगण्याचे कारण , जगण्याचे हे तत्त्व प्राचीन असून , त्याला हजार वर्षांचा इतिहास आहे . गेल्या दहा वर्षांमध्ये या तत्त्वाबद्दल जगभर कुतूहल निर्माण झाले आहे . काही संशोधक या तत्त्वाचा अभ्यासही करत आहेत .
इकीगाई म्हणजे जगण्याचे कारण आणि अर्थ शोधणे इकीगाई तत्त्व जपानमधील हेइअन ( Heian ) काळाशी संबंधित आहे . इसवी सन ७९४ ते ११८५ हा हेइअन काळ मानला जातो . जपानम धील ओकिनावा या भागात इकीगाई आधारित जीवनपद्धतीचा अवलंब केला जातो . ओकिनावा हा दक्षिण जपानमधील बेटांचा समूह आहे . हा समूह अमरभूमी ' म्हणून ओळखला जातो . जगातील सर्वाधिक शतायुषी ( वयाची शंभरी पार केलेले ) नागरिक या भूमीत राहतात . प्रसिद्ध पत्रकार डॅन बटनर यांनी २००९ साली शंभर वर्षे कसे जगायचे ' या विषयावर टेड टॉक म्हणजे व्हिडियोद्वारे व्याख्यान दिले होते . जगातील पाच ठिकाणी राहणारे नागरिक दीर्घकाळ जगतात , असे आढळले आहे . या पाच ठिकाणांना बटनरने ब्लू झोन असे संबोधले आहे .

ओकिनावा , ( जपान ) , सार्डिनिया , ( इटली ) , निकोया , ( कॉस्टा रिका ) , इकारिया , ( ग्रीस ) आणि | लोमा लिंडा , ( कॅलिफोर्निया ) . या पाचपैकी ओकिनावा येथील नागरिक सर्वांत जास्त काळ जगतात . यासंबंधीची आकडेवारीही बटनर यांनी सादर केली असून , ती इंटरनेटवर उपलब्ध आहे . त्यांनी म्हटले आहे , अमेरिकेत आयुष्याची विभागणी साधारणपणे दोन भागात केली जाते . वर्क लाइफ आणि रिटायरमेंट लाइफ .
ओकिनावात रियायरमेंट हा शब्दच कोणाला माहीत नाही . तेथे इकीगाई जीवनपद्धत प्रमाण मानली जाते . या पद्धतीचा अर्थ येथे तुम्ही सकाळी कोणत्या कारणाने जागे होता , ' असा लावला जातो . ' ओकिनावातील मासेमारी करणारा १०१ वर्षांचा कोळी सांगतो , माझ्या कुटुंबासाठी आठवड्यातून तीन वेळा मी मासेमारी करतो , त्यामुळे मी सकाळी उठतो . येथील १०२ वर्षांच्या आजी म्हणतात , मला माझ्या खापरपणतीला खेळवायचे असते , त्यामुळे मला सकाळी जाग येते . ' १०२ वर्षांच्या कराटे मास्टरला कराटेचे धडे भल्या पहाटे शिष्यांना द्यायचे असतात. त्यामुळे तो पहाटेच उठतो . या तिन्ही उदाहरणांवरून आपल्याला इकीगाई जीवनपद्धतीची कल्पना येते.
जगण्याचे उद्दिष्ट , अर्थ आणि प्रेरणा यांना ही पद्धती महत्त्व देते . जपानमधील तोहोकू विद्यापीठाच्या संशोधकांनी २००८ साली ४० ते ७९ या वयोगटातील ५० हजार नागरिकांचे सर्वेक्षण केले . त्यात इकेगाईचा अवलंब करणाच्या नागरिकांना हृदयविकाराचा धोका अत्यंत कमी असल्याचे आढळले . इकीगाई म्हणजे जगण्याचे कारण आणि अर्थ शोधणे . आपण सकाळी जागे का होतो यासारखे काही सोपे प्रश्न स्वतःला विचारून प्रत्येकाला हा अर्थ शोधता येतो . या शोधासाठी पाच कृती प्राधान्याने करता येण्यासारख्या आहेत.

१ . लहान कामाने सुरुवात : मोठी कामे वा उद्दिष्टे साध्य करायची असतील , तर सुरुवात लहान कामांनी केली पाहिजे . प्रत्येक लहान काम हे काळजीपूर्वक करा , म्हणजे तुमची टप्प्याटप्प्याने मोठ्या कामाकडे वाटचाल होईल . हे तत्त्व आयुष्यातील प्रत्येक उद्दिष्टाला लागू होते . उत्कृष्ट , कसदार अन्नधान्याची पैदास हे कोणत्याही शेतक - याचे उद्दिष्ट असते . ते साध्य करण्यासाठी तो जमिनीच्या मशागतीपासून सुरुवात करतो , तण उपटून ती साफ करतो . पेरणीस योग्य अशी जमीन करण्यासाठी त्याला बरीच कामे वेळच्या वेळी करावी लागतात . पिकांची लागवड , त्यांना पाणी , खत देणे , किडीपासून बचाव करणे अशा लहान कृतींमुळेच भरघोस पीक घेता येते.
'
'
२ . स्वतःच्या वास्तवाचा स्वीकार करणे : स्वत : बद्दलच्या वास्तवाचा स्वीकार केल्यास तुमच्या मनावर कोणताही बोजा राहात नाही . तुम्ही सकारात्मकतेने आणि ठोसपणे कृती करता ; मात्र स्वतःबद्दलच्या वास्तवाचा स्वीकार करणे अवघड असते . तो तुमच्या प्रगतीच्या मार्गातील मोठा अडथळाही असतो . तुम्ही जर स्वत : चा स्वीकार केला , तर नक्कीच समाधानी होता . समाधानाने केलेली कोणतीही कृती तुम्हाला - यश देते.
३ . लोकांबरोबर सामंजस्याचे संबंध ठेवा : तुमच्या संपर्कात येणा - या लोकाशा तुमचे सामंजस्याचे संबंध हवेत . आपण समूहाबरोबर काम करत आहोत याचे भान तुम्हाला हवे . यामुळे तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतो , प्रोत्साहन मिळते आणि तुम्ही तुमचे उद्दिष्ट गाठू शकता.
४ . लहान गोष्टींमधील आनंद : हवेची झुळूक , सकाळचा चहा , पहाटेची सूर्यकिरणे यासारख्या लहान गोष्टींचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे . तुमची दररोजची सकाळ प्रसन्न हवी . दररोज कोणत्या गोष्टी आनंद देतात ते तुम्हाला म हीत असले पाहिजे , त्यांचा अनुभव तुम्ही घेत राहिला पाहिजे.
५ . वर्तमानात राहा : सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे तुम्ही वर्तनमानात राहा . उपलब्ध क्षण भरभरून जगा . याशिवाय ही जगण्यातील कोणतीच लढाई जगू तुम्ही जाही . शकणार नाही.
इंटरव्ह्यू Hacks नौकरी पक्की मिलेगी
रोग देते हैं ग्रहमानसिक तणाव दूर करण्यासाठी feng shui उपाय
आनंदी दिर्घ आयुष्याचे जपानी रहस्य जाणून घ्या
Reviewed by Daily Wisdom
on
June 05, 2019
Rating:
No comments:
Post a Comment