पति पत्नी और वो affairs
मानसशास्त्राचे म्हणे आहे काहीजणांना जोडीदाराला सोडायचं नसतं ; पण बदल तर हवा असतो . ते तात्पुरती प्रकरणं करून तो मिळवतात ; मात्र ‘ असं प्रेम ही त्यांच्याकरता थोडी गंमत असते
लहान वयात भरपूर पैसा मिळणाच्या तरुण पिढीला जीवनात सतत गती व थरार हवे आहेत , प्रेमामध्ये ते मिळतात.
पण संसारात चाकोरी निर्माण होते , तेव्हा हे दोन्ही ' मायब होतात , त्यामुळे करमणुकीला असे पर्याय धिले जातात.
स्त्री आणि पुरुष यांच्यातले संबंध ही काही आधुनिक काळातली गोष्ट नाही . ते पूर्वापार अगदी ऋषीमुनींच्या काळापासून चालत आले आहेत . त्या वेळी त्याची चर्चा होत नव्हती , कारण एक तर तेव्हा प्रसारमाध्यमं नव्हती आणि दुसरं म्हणजे स्त्री - पुरुषांना उघडपणे एकत्र येण्याच्या संधी नव्हत्या .
बहुतेक राजेमहाराजे व ऋषी यांच्या प्रेमलीलांच्या ख - या वा काल्पनिक कथा आपण वाचत आलो , त्या स्त्रीचे वडील अथवा अन्य नातलग घरात नसताना घडलेल्या आहेत . ( म्हणजे ? हा सुद्धा सदियों पुराना मामला है ? माणसाचा स्वभाव सर्व काळामध्ये सारखाच असतो , असं दिसतं . की काळ बदलला तरी माणसाचा स्वभाव बदलला नाही ? असो . ) अगदी ४० / ५0 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे अशा संबंधांबद्दल बोलणं पाप मानलं जायचं . बयावाईट प्रकारचे संबंध तेव्हाही होतेच ; पण लोकापवादाच्या भीतीमुळे त्याच्याबद्दल उघड बोललं जात नव्हतं .
आज तसे संबंध असणार हे मान्य केलं जातं आणि त्याबद्दल उदार दृष्टी दाखवली जाते . म्हणजे अर्थातच दुर्लक्ष केलं जातं . यामुळेच की काय किंवा असे संबंध सरसकट घडत असल्यामुळे त्यांच्याबद्दल मर्यादेची आवश्यकताच वाटेनाशी झाली आहे आणि परिणामी असे संबंध बेसुमार वाढलेले दिसत आहेत . या बाबतीत नैतिक भूमिका घेऊन त्यांचा निशेध करण्याचा हेतू नाही . सर्व प्रकारच्या प्रेमसंबंधांना सामाजिक स्तरावर मोकळीक असूनही चोरट्या सबंधाबद्दल अजून आकर्षण का असावं ? प्रेमविवाह ही सर्वसामान्य घटना बनल्यानंतरही घटस्फोटांची संख्या का वाढावी ? प्रेमसंबंधांत आणि पती - पत्नींच्या नात्यामध्ये एकनिष्ठतेला स्थानच राहिलं नाही का ? एकमेकांच्या प्रेमात पडून स्वखुषीनं विवाह करणारे एकमेकांना कंटाळतात का ? - अशी अनेक प्रश्नचिन्ह मनात उभी राहतात व अस्वस्थ करतात . प्रेम व लग्न यांच्या बाबतीत कौटुंबिक आणि सामाजिक पातळ्यांवर पूर्ण स्वातंत्र्य मिळालं ; पण प्रेमात व जीवनातही स्थैर्य नाही , अशी तरुण पिढीची केविलवाणी अवस्था दिसते आहे , ती का ?
प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ . चंद्रसेन कनल यांच्या मते , आजच्या माणसाला सतत वेगवान व थरारक जीवन जगायची चटक लागली आहे . आयपीएल स्पर्धेतल्या वन डे क्रिकेट मॅचेस हे त्याचं प्रतीक आहे . माणूस विवाहबद्ध झाला की संसार सुरू होतो आणि बघता - बघता त्याची एकसुरी , कंटाळवाणी चाकोरी बनते . त्यामुळे आधुनिक स्त्री - पुरुष विवाहबाह्य संबंधांकडे आकर्षित होतात . हे मान्य करायचं तर प्रश्न पडतो की , माणसाला चाकोरीचा कंटाळा येतो तेव्हा तो प्रवासाला जातो किंवा ते जमत नसेल तर सिनेमाला , नाटकाला किंवा क्रिकेटच्या मॅचला जातो . संगीत ऐकतो किंवा शिकतो . वाचन किंवा लेखन करतो . हे सगळे चाकोरी सुसह्य करण्याचेच तर उपाय आहेत . मग इथे जो न्याय आहे , तोच जोडीदारालाही लावायचा की काय ? म्हणजे करमणुकीला बरेच पर्याय असतात , तसे जोडीदारांनाही पर्याय ठेवायचे का ? आणि याच न्यायानं जोडीदारानं पर्याय निवडला , तर तो चालेल का ?
नाटक - सिनेमातले आणि अर्थातच टीव्हीचेसुद्धा बरेच पुरुष कलाकार त्या - त्या क्षेत्रात यशानं झगमगू लागले की , पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन त्यांच्या क्षेत्रातल्या एखाद्या तोलामोलाच्या स्त्रीशी दुसरा विवाह करतात . वास्तविक पहिली पत्नी त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्या बाजूनं उभी राहिलेली असते . तिनं कष्ट काढलेले असतात . प्रसंगी दागिने विकून संसार चालवलेला असतो ; पण पतीला चांगले दिवस येतात तेव्हा या बापडीचे दिवस फिरतात . तिला पतीपासून दूर व्हावं लागतं आणि त्याची संपत्ती , कीर्ती , सुस्थिती यांचा लाभ दुस - या स्त्रीला मिळतो .
पहिली पत्नी प्रतिष्ठेच्या दृष्टीनं सोयीची राहिलेली नसते , हे हा पहिला साधा , सामान्य संसार तुटण्याचे कारण बनतं का ? ही झाली असामान्यांची कथा . ज्यांच्यापाशी नावलौकिक , प्रसिद्धी नाही पण भरपूर पैसा आहे , त्यांचं काय ? ते या विषयात असामान्यांहून निराळे नाहीत ; त्यांच्यापेक्षा मागे नाहीत ; उलट भाग्यवान आहेत . कारण बड्यांच्या भानगडींच्या , विशेषत : नाटका सिनेमातल्या किंवा प्रसिद्धी लाभलेल्या बड्यांच्या ' गुलाबी ' प्रकरणांची जोरदार चर्चा होते .
पूर्वी ती विशिष्ट नियतकालिकांपुरतीच मर्यादित होती . आता टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रं ही माध्यमदेखील त्यांची खुलेआम चर्चा करतात . पैसेवाल्या सामान्यांना अशा तथाकथित बदनामीचा सामना करावा लागत नाही . अर्थात अशा बदनामीला बड़ी माणसं घाबरतात अशातला भाग नाही , अशी प्रसिद्धीसुद्धा पुरुषाच्या मर्दुमकीचं असते . त्यामुळे तारुण्य आसरलेले नायक नेहमी तरुण गिकांबरोबर वावरतात आणि खोटी किंवा तात्पुरती ऐमपकरणं करून लोकांच्या नजरेसमोर राहतात .
पाचव्या सहाव्या दशकातल्या राज कपूरसारख्या नायकांना त्यांची प्रतिभा फुलण्यासाठी प्रेमप्रकरणाचं खतपाणी आवश्यक वाटायचं . त्यामुळे त्याच्या प्रत्येक नायिकेशी त्याचं प्रकरण असल्याच्या अफवा उडायच्या . राज त्यांचा इन्कार करायचा नाही . कारण त्यातून त्याच्या चित्रपटाचा प्रदर्शनाआधीपासून गाजावाजा व्हायचा . ( ते त्या काळातलं प्रमोशन अँड मार्केटिंग ' होतं म्हणा ना . ) ' मात्र प्रेमाकरता संसार मोडणं राज कपूरला मान्य नव्हता . टीव्हीवरच्या एका मुलाखतीत या आर्य भारतीय देव पुरुषानं स्पष्टच सांगितलं होतं की , ' बीवी तो बीवी होती है और अॅक्ट्रेस - अँक्ट्रेस ! बीवी की जगह , घर में है , और अॅक्ट्रेस की स्टुडिओ में . वो घर में नहीं आ सकती . ' राजचा काय , त्या काळातल्या सर्वच पुरुषांची भाव स्त्रियाबद्दल हीच विचारसरणी होती . त्यांच काळ बदलला . आताच्या पत्नी आणि प्रेयसी राहते पुरुषांची हा दुहेरी लबाडीचा खेळ चालवून घेत नाहीत , उध्वर एखादी हसीन शमी क्रिकेटपटू पतीच्या प्रतारणेचा सामं जाहीर पाढा वाचते , तर कंगना रनौट हृतिक रोशनच्या कधी थयथयाटाला तोडीस तोड जाहीर प्रत्युत्तर देते .
असामान्यांकडे पाहिलं तर ब - याचजणांची ऑफिसमध्ये प्रेमाची दुसरी इनिंग चालू असते . त्यांनाही आपलं घर मोडायचे नसत ; पण हातात आलेला सुखाचा प्याला खाली ठेवायचा नसतो . कारण . . . कारण यात उभयपक्षी भावनिक गुंतणूक नसते . काहीजण थोडीशी गंमत . . थोडासा रूचिपालट म्हणून या प्रेमप्रकरणाकडे बघत असतात . घटस्फोटाला आता कलेक वा गुन्हा मानलं जात नसलं , तरी अजूनही त्याला सामाजिक अप्रतिष्ठेचं अस्तर आहेच . घटस्फोटाचा व्यवसायावरही परिणाम होतोच . पैसा घटत नाही ; पण पत घटतेच . म्हणून फार काळजीपूर्वक अशी प्रकरणे केली जातात .
खूपदा या बदल्यात अधिकारपदाची देवघेव होते . मात्र , प्रकरण चालू राहिलं किंवा संपलं तरी दोन्हींकडून तेरी भी चूप मेरी भी चूप हा करार बिनचूक पाळला जातो . पंचाईत असते परस्त्रीमध्ये किंवा परपुरुषात भावनिकदृष्ट्या गुंतणा - यांची . घटस्फोट घेतला तरी त्यांची स्थिती वाईट असते ; नाही घेतला तरी तशीच राहते . ज्यांचे प्रेम - विवाह मोडतात , त्यांचं आयुष्य तर उध्वस्त धर्मशाळा बनतं . प्रेम कुठे जातं ? परस्परांतलं सामंजस्य का संपतं ? अस्थैर्याचा विषाणू यांच्या घरात कधी व कसा शिरतो ? या प्रश्नांची उत्तरं शेवटपर्यंत मिळत नाहीत . तडफड आणि वेदना सोबतीला राहतात .
पति पत्नी और वो affairs
Reviewed by Daily Wisdom
on
June 12, 2019
Rating:
No comments:
Post a Comment