चतुर कोल्हा आणि बोलकी गुहा
चतुर कोल्हा आणि बोलकी गुहा |
बोधकथा
एकेकाळी तरुण असलेला आणि आपल्या ताकदीच्या बळावर शिकार करणारा सिंह आता म्हातारा झाला होता. आता त्याला भूक भागवण्यासाठी आयत्या शिकारीवर अवलंबून राहावे लागत असे . एकदा असाच तो भुकेने व्याकूळ होऊन शिकारीच्या शोधात फिरत असताना एका गुहेजवळ पोहोचला . नक्कीच या गुहेत एखादा प्राणी राहात असावा हे त्याने ओळखले .
आपण त्या प्राण्याची वाट पाहात गुहेतच थांबावे आणि तो येताच त्याची शिकार करावी असा बेत त्याने आखला. तो गुहेत जाऊन बसला . ती गुहा एका कोल्ह्याची होती . संध्याकाळी तो गुहेकडे आला . त्याला गुहेबाहेर सिंहाच्या पावलांचे ठसे दिसले . आपल्या गुहेत सिंह शिरला होता हे त्याने ओळखले . पण तो अजूनही गुहेतच आहे की निघून गेला आहे हे त्याला समजेना .
आपण बेसावधपणे आत गेलो तर सिंह आपल्याला मारणार हे नक्कीच . सिंह गुहेत आहे का हे पाहण्यासाठी त्याला एक युक्ती सुचली . तो म्हणाला , ‘ गुहाबाई गुहाबाई आत येऊ का ? ' गुहेकडून काहीच उत्तर आले नाही. थोड्या वेळाने कोल्हा पुन्हा म्हणाला , ' गुहाबाई , आज तू बोलत का नाहीस ? माझ्यावर रुसली आहेस का ? सांग ना , मी बसलेल्या सिंहाला वाटले , ही गुहा नक्कीच आत येऊ का ? ' आत बोलत असेल .कदाचित मला पाहून ती ' उत्तर देत नसावी .
बाहेरून कोल्ह्याने पुन्हा विचारले , ' गुहाबाई , गुहाबाई आता मात्र ' मी तू बोलली नाहीस तर मी दुस-या गुहेत निघून जाईल . ' कोल्ह्याचे ते बोलणे ऐकून सिंहाला आता आपणच गुहेच्या आवाजात बोलायला हवे नाहीतर आपल्या हातून ही शिकार निसटून जाईल असे वाटले . तो आवाज बदलून म्हणाला , ' कोल्हे दादा कोल्हेदादा, असे रूसू नका . मी केव्हापासून ' तमची वाट पाहाते आहे . लवकर आत ' या ' तो आवाज ऐकताच आतमध्ये सिंह असल्याची कोल्ह्याची खात्री पटली . त काहीही न बोलता तिथून पळून गेला .
चतुर कोल्हा आणि बोलकी गुहा
Reviewed by Daily Wisdom
on
June 03, 2019
Rating:
No comments:
Post a Comment